विदर्भातील ‘या’ चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट घोषित
नागपूर, दि. २७: हवामान विभागानं अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह, जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गाराही पडू शकतात असं हवामान विभागानं कळवलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद आणि लातूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे