विदर्भातील तीन जिल्ह्यात १३ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ जेरबंद
चंद्रपूर, दि. १३ : वर्षभरात गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातल्या १३ नागरिकांना मारणाऱ्या सिटी-एक या वाघाला आज सकाळी वन विभागाने जेरबंद केलं. ताडोबा व्याघ्र शीघ्र बचाव दल, नवेगाव-नागझिरा व्याघ्र शीघ्र बचाव दल आणि अमरावती व्याघ्र शीघ्र बचाव दलाच्या चमूने ही कारवाई केली.
डिसेंबर २१ पासून आज पर्यंत या वाघाने वडसा, ब्रह्मपुरी आणि भंडारा या वनविभागात मिळून १३ माणसे आणि पाळीव जनावरांना मारले होते. या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे