स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालण्याची देवेंद्र फडनवीस यांची मागणी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पुस्तिकेवर राज्यात बंदी घालावी अशी मागणी, भाजपाचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सेवा दल ही मध्यप्रदेशातली काँग्रेसशी संलग्न असलेली संघटना आहे. हे पुस्तक म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचं प्रतीक असून काँग्रेस अशा प्रकारच्या पुस्तकांचं वितरण करून विकृत विचारांचा प्रसार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
