खासदार संजय राऊत यांना वरिष्ठ कॉंग्रेस नेत्याचा फोन
मुंबई, दि. १८: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. त्यानंतर आता काँग्रेसने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संजय राऊत यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली.
जयराम रमेश म्हणाले की, “मी सकाळी संजय राऊत यांच्याशी बोललो, आमची प्रदीर्घ चर्चा झाली. सावरकरांच्या मुद्द्यावर त्यांचे आणि राहुल गांधींचे मत भिन्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.”
