Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर १७.१६ कोटी रुपये जमा

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती

मुंबईदि. १८ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडलेअशा ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १७.१६ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

सिंह म्हणालेराज्यामध्ये दि. १७ नोव्हेंबर, २०२२ अखेर ३४ जिल्ह्यांमधील एकूण ३ हजार ६०८ संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण २,६३,७५५ बाधित पशुधनापैकी एकूण १,८९,९१२ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी १७ हजार ६५८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४४.१२ लाख लम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३७.८९ लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांवअहमदनगरधुळेअकोलाऔरंगाबादबीडउस्मानाबाद, कोल्हापूरसांगलीसोलापूरवाशिमजालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्थासहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे ९८.५५ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. ७ ऑक्टोबर२०२२ रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रणनिर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या सुधारीत उपचार विषयक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना  आवाहन करण्यात आले की त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.

नुकत्याच क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत  झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांनातसेच अद्यापही लसीकरण  न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसारगोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही सिंह यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *