वाशी इथल्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये दररोज १०० ते १२० गाड्या कांदा बटाट्याची आवक
नवी मुंबई, दि.२१: नवी मुंबई येथील वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या(एपीएमसी) आवारातील कांदा-बटाटा मार्केटमध्ये सध्या दररोज १०० ते १२० गाड्या कांदा बटाट्याची आवक होत आहे.
मात्र कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा-बटाट्याची आवक सुरळित सुरू असूनही मालाला उठाव नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
केवळ अधिकृत खरेदीदारच बाजारात खरेदी करू शकतात; तसंच सध्याच्या निर्बंधांमुळे हॉटेल, खानावळीला लागणाऱ्या दुय्यम कांद्यालाही उठाव मिळत नाही.
अशीच परिस्थिती राहीली तर कांद्याचे दर गडगडण्याची भीती व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
Source – AIR
