वरुण धवन डिसेंबरमध्ये अडकणार लग्नाच्या बेडीत, वाचा कोण आहे ती?
सध्या बॉलिवूड मध्ये लगीन सराई चालू आहे, रणवीर-दीपिका, प्रियांका-निक, अनुष्का-विराट यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमध्ये वरुण धवनच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
वरुण आणि नताशा शाळेपासून एकमेकांना ओळखत असून, गेली काही वर्ष त्यांचं अफेअर सुरू आहे. लवकरच वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल बोहल्यावर चढणार आहे.
करण जोहरच्या चॅट शोमध्ये वरुणनं नताशाबरोबरच्या नात्याला दुजोरा दिला होता. वरुण आणि नताशा ही दोघं डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं समजतंय. या दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे.