वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर
आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेल्या वंचित बहुचन आघाडीकडून ३७ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या यादीत उमेदवाराच्या नावापुढे जातही नमूद करण्यात आल्या आहेत.
बौद्ध, कुणबी, माळी, धनगर, भिल्ल, कोळी, वडार, आगरी, शिंपी, वारली, लिंगायत, लोहार, मुस्लिम, बंजारा, कैकाडी, मातंग आणि धिवर अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. 37 जणांच्या यादीत दोन महिला आणि दोन मुस्लीम व्यक्तींचा समावेश आहे.
मावळमध्ये पार्थ पवार यांच्याविरोधात राजाराम पाटील उभे आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात नवनाथ पडळकर उभे आहेत. तर हातकणंगले येथे राजू शेट्टी यांच्याविरोधात अस्लम बादशाहजी सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सहदेव एवळे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


