आज १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाइन डे’. जगभरात प्रेमदिन म्हणून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या हृदयाजवळच्या व्यक्तीसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ खास मानला जातो. सोशल मीडियाच्या दिवसेंदिवस वाढत्या लोकप्रियतेमुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांचे प्रमाणही सध्या वाढले आहे. महाविद्यालयीन तरुण आणि युवा पिढी एकमेकांना यादिवशी फूल, चॉकलेट आणि गिफ्ट्स देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.
व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी दुकाने गुलाबी आणि लाल वस्तूंनी सजलेली असतात. त्यातच सोनेरी रंगाचे गुलाब आणि हृदयाच्या आकाराच्या मेणबत्त्याही बाजारामध्ये आलेल्या दिसत आहेत. तर सांगा तुम्ही कोणासोबत ह्या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे साजरा करताय ?