वैभव नाईक यांचे नारायण राणे यांना काही बोचरे सवाल
मुंबई/मालवण: सध्या नारायण राणे हे त्यांच्या आगामी आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. परवाच एका वृत्त वहिनीने त्यांच्या पुस्तकातील लिखाणाचा हवाला देत शिवसेना व उद्धव ठाकरेंबाबत काही गौप्यस्फोट केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगितलं की, “जर नारायण राणे पक्षात आले तर मी आणि माझी पत्नी घर सोडून निघून जाऊ” आता या सर्व दाव्यांचा व आरोपांचा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी इन्कार केला आहे. तसेच या गोष्टी मी प्रथमतः ऐकतो आहे असेही ते पुढे म्हणाले.
तर दुसऱ्या बाजूला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा मालवण मतदारसंघातून पराजय करणारे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत की, नारायण राणे यांचं आत्मचरित्र हे दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठो आहे, स्वतःवरील आरोपांबाबत आपलं मत काय? तसेच आमदार नाईक यांचे काका श्रीधर नाईक यांच्या हत्या प्रकरणाबाबत व चेंबूर, कोकणातील गुन्ह्यांबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नारायण राणे आणि वैभव नाईक यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे नारायण राणे काय प्रत्युत्तर देतात हे महत्वाचे ठरेल.
