अमेरिकेने दिली जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कोरोना लसीला मान्यता; ६६ टक्के प्रभावी असल्याचा दावा
अमेरिकेच्या सरकारने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या एकच मात्रा (डोस) असलेल्या कोरोना लसीला मान्यता दिली आहे.
अमेरिकेची मान्यता असलेली ही तिसरी लस आहे. ही लस फायझर आणि मॉडर्ना या लसींच्या तुलनेत स्वस्त असेल आणि याची साठवणूक करणंही इतर लसींच्या तुलनेत सोपे आहे. ही लस ६६ टक्क्यांपर्यत प्रभावी असल्याचं चाचण्यांमधून समोर आले आहे.
जून महिन्याच्या शेवटापर्यंत या लसीचे १० कोटी डोस अमेरिकी सरकारला देण्याचे या कंपनीने मान्य केले आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत ही लस अमेरिकी नागरिकांना उपलब्ध होईल. ब्रिटन, युरोप आणि कॅनडानेही या लसीची मागणी केली आहे तर ५० कोटी डोस कोवॅक्स योजनेतून गरीब राष्ट्रांना देण्यात येतील.
