पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भारत बायोटेक च्या ‘कोवॅक्सिन’ लसीचा पहिला डोस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन स्वतः लसीची पहिली मात्रा टोचून घेतली आणि लोकांना देखील लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणाले की, “ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “एम्स येथे कोविड-19 लसीची मी पहिली मात्रा घेतली. कोविड-19 विरूद्ध जागतिक लढाई बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी अतिशय वेगाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. लस घेण्यास जे पात्र आहेत त्यांनी लस घेण्याचे मी सर्वांना आवाहन करतो. आपण सर्व मिळून भारताला कोविड-19 मुक्त करूया !”
आपण सर्वांनी मिळून देशाला कोविड-१९ पासून मुक्त करण्याचा संकल्प करुया असं सांगून मोदी यांनी देशातील डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांच्या कार्याची प्रशंसा केली. पुदूच्चेरीच्या परिचारिका पी. निवेदा यांनी मोदी यांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस टोचली.
