Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उत्तर भारताला थंडीच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता

हवामान विभागाचा इशारा

उत्तर भारतातल्या बहुतेक भागात आज दाट धुकं पसरलं होतं. दिल्लीत पारा १ पूर्णांक ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. १५ जानेवारीपर्यंत दिल्लीतील खाजगी शाळांनी सुट्टी जाहीर करावी असं आवाहन दिल्ली राज्य सरकारनं केलं आहे. सरकारी शाळांना याआधीच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली इथं थंडीची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर राजस्थान आणि बिहारमध्येही थंडीची लाट येईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. देशाच्या वायव्य भागातील पठारावरील थंडीचा कडाका पश्चिम हिमालयीन भागातील अडथळ्यांमुळे उद्यापासून कमी होईल तसंच वायव्य आणि मध्य भारतातील तापमानात हळूहळू काहीशी वाढ होईल असं हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर एम. मोहपात्रा यांनी सांगितलं.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *