Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उत्तर प्रदेश मध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणांगणात खलबतांना वेग

उत्तर प्रदेश मध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणांगणात खलबतांना वेग

लखनऊ: उत्तर प्रदेश मधल्या आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु असून विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची आणि प्रचारकांची नावं जाहीर करत आहेत. बहुजन समाज पार्टीने पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी ३० स्टार प्रचारकांनी यादी घोषित केली आहे. यामध्ये बसपा च्या अध्यक्ष मायावती, उपाध्यक्ष आनंद कुमार, सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा आणि समन्वयक आकाश आनंद यांचा समावेश आहे.

समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष या दोघांनीही हरदोई जिल्ह्यातील संदिला जागेवर आपापल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. एकीकडे आझाद समाज पक्षाने ३० प्रादेशिक पक्षांसोबत युती केली आहे. तर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत समाजवादी पक्षाने शामली जिल्हयातल्या कैराना मतदार संघातल्या भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आयोगाने आतापर्यंत आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी ३०९ एफआयआर(FIR) दाखल केले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *