युपीएससी UPSC च्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवार यशस्वी
पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांनी स्थान मिळवले
नवी दिल्ली, दि. ७ : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा–२०२५ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून देशभरातील एकूण ९५८ उमेदवार यामध्ये यशस्वी ठरले आहेत. या यशस्वी उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे.
या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांनी स्थान मिळवले आहे. हृषीकेश आलासे यांनी ६१ वा, आकाश त्रिवेदी यांनी ७३ वा, गौरव चोप्रा यांनी ८३ वा, सायली पगार यांनी ८७ वा तर दीक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक मिळवला आहे.
महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार
हृषीकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१).
केंद्र सरकारच्या विविध सेवांमधील रिक्त पदांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अंतिम निकालानुसार निवड झालेल्या ९५८ उमेदवारांची विविध सेवांमधील नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
या यशस्वी उमेदवारांमध्ये सामान्य (ओपन) गटातील ३१७, आर्थिक मागास प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) १०४, इतर मागासवर्गीय (ओबीसी) ३०६, अनुसूचित जाती (एससी) १५८ आणि अनुसूचित जमाती (एसटी) ७३ उमेदवारांचा समावेश आहे. तसेच आयोगाने २५८ उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली असून त्यात सामान्य गट १२९, ईडब्ल्यूएस २६, ओबीसी ८६, एससी ८ आणि एसटी ६ उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय तीन दिव्यांग उमेदवारांचाही समावेश आहे.
विविध सेवांमधील रिक्त पदे
भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) : एकूण १८० जागा
सामान्य – ७४, ईडब्ल्यूएस – १८, ओबीसी – ४७, एससी – २८, एसटी – १३.
भारतीय विदेश सेवा (आयएफएस) : एकूण ५५ जागा
सामान्य – २२, ईडब्ल्यूएस – ६, ओबीसी – १५, एससी – ८, एसटी – ४.
भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) : एकूण १५० जागा
सामान्य – ६०, ईडब्ल्यूएस – १५, ओबीसी – ४२, एससी – २२, एसटी – ११.
केंद्रीय सेवा गट ‘अ’ : एकूण ५०७ जागा
सामान्य – २११, ईडब्ल्यूएस – ४८, ओबीसी – १४१, एससी – ७३, एसटी – ३४.
केंद्रीय सेवा गट ‘ब’ : एकूण १९५ जागा
सामान्य – ७९, ईडब्ल्यूएस – १७, ओबीसी – ६१, एससी – २७, एसटी – ११.
आयोगाने नमूद केल्याप्रमाणे एकूण ३४८ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरूपाची राहणार आहे. नागरी सेवा परीक्षा–२०२५ चा अधिकृत निकाल व यशस्वी उमेदवारांची संपूर्ण यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
