काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचार काळात माझ काम केलं नाही; उर्मिला मातोंडकर यांचा लेटर बॉम्ब
मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या. या पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यां विरोधात तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना लिहिलेलं एक पत्र आता समोर आलं आहे.
सदर पत्र लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर १६ मे २०१९ रोजी लिहिलं गेलं आहे. या पत्रात उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या निवडणूक प्रचार काळातील असहकाराबाबत आरोप करण्याचे आलेला आहे. प्रचारकाळात चुकीची रणनीती अवलंबल्याचाही आरोप पुढे त्यांनी केला
या लेटर बॉम्ब च्या वादाला मिलिंद देवरा व संजय निरुपम वादाची किनार असल्याचे मानले जाते. दोनच दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा अचानक राजीनामा दिला आहे. आता या नाट्यात पुढे काहीतरी धक्कादायक घडू शकतं अशी अटकळ बांधली जात आहे.

