देशभक्ती म्हणजे काय ह्याची शिकवण देणारे तुम्ही कोण? – उर्मिला मातोंडकर
मुंबई: देशात युतीचे सरकार आल्यानंतर विकासापेक्षा हिंसक वातावरणाचे प्रमाण अधिक वाढले आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केलेली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने भाजपावर केली आहे. देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? असा थेट प्रश्नही उर्मिलाने यावेळी भाजपला केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने भाजपवर तोफ डागली.
‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असं म्हटलं जातं. मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढलं, देशात विकासाचं चित्र कुठे आहे? निवडणुकीत जिंकून येण्यासाठी भाजपने लोकांना विकासाची स्वप्न दाखवली.अशी टीका उर्मिलाने यावेळी केली.
खरी देशभक्ती म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? हे सांगणारे तुम्ही कोण असा प्रश्न उपस्थित करत भाजपाने जनतेला निवडणुकीपरते आश्वासनं दिल्याचं तिने म्हटलं. काळा पैसा, नोकऱ्या कुठे गेल्या असा प्रश्नही उर्मिलाने यावेळी उपस्थित केला.
महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, मराठी माणसांचा मुद्दा हे विषय महत्त्वाचे असून याकडे भाजपने आतापर्यंत दुर्लक्ष केल्याचंही उर्मिलाने सांगितलं.
