मॉडल उर्फी जावेद चे वकील अॅड. नितिन सातपुते यांची माध्यमांना माहिती
मुंबई, दि. १३: रिअॅलिटी टीव्ही स्टार उर्फी जावेद यांचे वकील अॅड. नितिन सातपुते यांनी महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांच्या विरोधात आज दि. १३/०१/२०२३ रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ यांनी “मुंबईच्या रस्त्यावर सार्वजनिकपणे नग्नतेमध्ये सहभागी होण्यासाठी” तिला अटक करण्याची मागणी केली होती. उर्फीने तिच्या तक्रारीत गुन्हेगारी धमकीचा उल्लेख केला आहे.
या प्रकरणी माहिती माध्यमांना माहिती देताना उर्फीचे वकील नितीन सातपुते म्हणाले, “मी भाजप पक्षाच्या कार्यकर्त्या श्रीमती विरुद्ध आयपीसीच्या १५३(ए)(बी), ५०४, ५०६, ५०६(ii) गुन्ह्यासाठी तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक डोमेनवर मॉडेल/अभिनेत्री उर्फी जावेदला हानी पोहोचवण्याची धमकी, आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल चित्रा किशोर वाघ तसेच Cr.P.C च्या U/s 149 आणि 107 प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती केली आहे. ते पुढे म्हणाले, “मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पुढील कारवाईसाठी मी महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांची भेट घेणार असून लेखी तक्रार देणार आहे.”
नुकतीच भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यादरम्यान सोशल मीडियात शब्दयुद्ध चालू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
