उरण तालुक्यातील विविध समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची भेट
उरण/मुंबई: उरण तालुक्यातील काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची काल दादर येथील टिळक भवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध विषयां संबंधी महसूल मंत्र्यांशी चर्चा केली. तसेच त्यांनी उरणमधील नागाव व म्हातवलीतील सिडको संपादित झालेल्या सिडकोने व ओएनजीसी कंपनीने न वापरण्यात आलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळाव्यात व उरण नागाव पिरवाडी समुद्र किनाऱ्यालगतच्या समुद्राच्या पाण्याने धुपुन गेलेल्या जमिनींसंदर्भात मंत्री थोरतांना निवेदन दिले.
याच सोबत उरण तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीबाबत तसेच आगामी काळातील स्थानिक पातळीवर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा केली.
या बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वरील सर्व विषयांत मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उरण तालुक्यातील दत्ता पांडुरंग म्हात्रे, उरण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष देविदास धनाजी थळी, उरण तालुका सरचिटणीस हरेश्वर नारायण पाटील, नागाव काँग्रेस अध्यक्ष तसेच कार्यकर्ते दिनेश प्रसाद, जगदीश सिंग, शेखर गजानन म्हात्रे व प्रशांत मारुती पांचाळ उपस्थित होते.
