Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“एचडीआयएल”च्या मालमत्तांचं मूल्यांकन आणि विक्री करण्याकरता मुंबई उच्च न्यायालयानं केली एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना

“एचडीआयएल”च्या मालमत्तांचं मूल्यांकन आणि विक्री करण्याकरता मुंबई उच्च न्यायालयानं केली एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना

एचडीआयएल अर्थात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून पीएमसी बँकेला देय असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी एचडीआयएलच्या मालमत्तांचं मूल्यांकन आणि विक्री करण्याकरता मुंबई उच्च न्यायालयानं एका त्रिसदस्यीय समितीची काल स्थापना केली.

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल आणि त्यातल्या इतर दोन सदस्यांची निवड राधाकृष्णन करतील. याबाबतचा प्रगती अहवाल ३० एप्रिलला सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती आर व्ही मोरे आणि न्यायमूर्ती एस पी तावडे यांच्या खंडपीठानं दिले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *