Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल-उरण मार्गावरील नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

पनवेल-उरण मार्गावरील नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): उरण-पनवेल रोड वरील सिडको ऑफिस शेजारी कोसळण्याच्या स्थितीत असलेला पूल व फुंडे गावा शेजारी ५ महिन्यांपूर्वी कोसळलेला पूल यामुळे फुंडे, पाणजे, डोंगरी गावातील ग्रामस्थांची खूप मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सिडको कार्यालय जवळील पूल कधीही कोसळू शकतो. जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या मार्गांवर वाहनांना बंदी घालण्यात आली असून वाहने दुसऱ्या मार्गाने वळविली जात आहेत. तर ५ महिन्यापूर्वी फुंडे येथील पूल कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला होता मात्र या ठिकाणी अजूनही नवीन पूल बांधला गेला नाही. त्यामुळे फुंडे, पाणजे, डोंगरी या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

शासकीय कार्यालयात जाणे-येणे तसेच बाजार व नोकरीनिमित्त येण्या-जाण्यासाठी सुमारे १० ते १२ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे वेळ पैसा श्रम वाया जात आहेत. जास्त प्रमाणात खर्च होत आहे. याचा नाहक त्रास फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील नागरिकांना होत आहेत. त्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ तसेच फुंडे ग्रामपंचायतचे उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य – ऍड. कैलास म्हात्रे, डोंगरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच दर्शना घरत, फुंडेचे माजी सरपंच अशोक ठाकूर, नंदकुमार म्हात्रे, रमेश म्हात्रे, विलास म्हात्रे आदी मान्यवरांनी सिडको कार्यालय येथील आशिष खोब्रागडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता सिडको कार्यालय द्रोणागिरी नोड १ या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

पूल त्वरित बांधण्यात यावेत असेच पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी केली गेली. सदर निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून याबाबत योग्य ते पाऊलं उचलली जाईल असे आश्वासन सिडकोचे अभियंता आशिष खोब्रागडे यांच्याकडून देण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *