Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात

उरण, दि.२७(विठ्ठल ममताबादे): महाड येथील पूरग्रस्त नागरिकांची व्यथा लक्षात घेता महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे महाड येथील कोंडीवते ग्रामपंचायत तसेच नागलवाडी फाटा येथे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पूरग्रस्त नागरिकांच्या घरांना भेटी देत, त्यांच्या दुःख वेदना समजावून घेऊन पूरग्रस्त नागरिकांना सामान वस्तू वाटप करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सदर परिस्थिती बघून अश्रू अनावर झाले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, खजिनदार सुरज पवार, संपर्क प्रमुख ओमकार म्हात्रे, आकाश पवार, नितेश पवार, सुविध म्हात्रे, साहिल म्हात्रे, हेमंत ठाकूर, इंद्रजित पवार, अभिजित भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तींना सामानाचे प्रत्येकी एक किट देण्यात आले. एका किट मध्ये गहू, तांदूळ, इतर अन्नधान्य, कपड्याचे साबण, अंघोळीचे साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, पाणी बॉटल, चादर, बेडशीट, सतरंजी, कपडे, टॉवेल, बिस्कीट, फरसाण, साखर, चहापत्ती यासह इतर जीवनाश्यक वस्तूंचा समावेश होता.

कोंडीवते ग्रामपंचायतचे सरपंच सुनील डाऊर, उपसरपंच राजाराम शिंदे, पोलीस पाटील धोंडीराम दिघे, माजी सरपंच पांडुरंग पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हातात ४० किट देण्यात आले तसेच इतर ५० किट वेगवेगळ्या भागात घरोघरी जाऊन वाटण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले. उरण मधील नागरिकांनी स्वेच्छेने अनेक जीवनावश्यक वस्तू दिल्यामुळेच पूरग्रस्त व्यक्तींना मदत करता आली. गोरगरिबांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे असे अध्यक्ष सुदेश पाटील म्हणाले. या कामासाठी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी यावेळी आभार मानले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *