Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर युनिव्हर्सल फायर अँड सेफ्टी सर्विसेस कंपनीने तरुणाचे थकीत वेतन केले अदा

महाराष्ट्र वार्ताच्या बातमीनंतर जुन्नर येथील शिवसैनिक सुशांत दरेकर यांनी दिली या कंपनीवर धडक

नवी मुंबई, दि.२३ : साधारण दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ सदरांतर्गत आम्ही यूनिवर्सल फायर सेफ्टी अँड सर्विसेस या कंपनीने एका माजी कर्मचार्‍याचे वेतनपोटी येणारे रु. २६,४००/- थकवल्याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. हे वृत्त प्रसारित झाल्यावर या कंपनीचे व्यवस्थापन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत तक्रारदार युवक बाबू पवार याच्या जुन्नर गावाचे शिवसेना कार्यकर्ते सुशांत दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी महापे, नवी मुंबई येथील या कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल लोंढे यांना त्यांनी महाराष्ट्र वार्ताने प्रसारित केलेले वृत्त दाखवले व अद्याप या बाबू पवारचे पैसे न दिल्याबाबात जाब विचारला. अखेर लोंढे यांनी आपण उद्याच बाबू पवारच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन देत २६,४००/- रूपयांचा चेक दिला.

काल सकाळी अखेर राहुल लोंढे यांनी या तरुणाला तरुणाच्या बँक खात्यात थेट थकीत वेतन जमा केले. या नंतर बाबू पवार ने या प्रकरणी सहाय्य केल्याबद्दल महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम व सुशांत दरेकर यांचे आभार मानले. सुशांत दरेकर हे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील शिवसेना नेते माजी आमदार शरद सोनवणे यांचे मर्जीतील कार्यकर्ते मानले जातात.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *