संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान सस्थ्येचं
जागतिक तापमान वाढ दीड अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या आपल्या निर्धारित उद्दिष्टापासून जग अजून दूर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. पूर, उष्णतेची लाट आणि वादळं यासारख्या आकस्मिक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी आधीच त्रस्त झालेल्या जगाला त्यामुळे हवामान बदलाच्या समस्यांनाही सामोरं जावं लागत आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल संस्थेनं म्हटलं आहे.
२०० राष्ट्रांच्या एकत्रित वचनबद्धतेनंतर तापमानवाढ अडीच अंश सेल्सिअसपर्यंत कमी ठेवण्यात यश आलं आहे. आधीच्या शतकाच्या अखेरच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे, असं या संस्थेनं म्हटलं आहे. २०१५ च्या पॅरिस कराराप्रमाणे दीड अंश सेल्सिअसचं लक्ष गाठण्यासाठी २०१० च्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण २०३० पर्यंत ४५ टक्क्यानं कमी होण्याची गरज आहे, असं या संस्थेनं म्हटलं आहे.
