हिंगणघाट प्रकरणी जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू
मुंबई: वर्धा हिंगणघाट प्रकरणी आता जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात सरकारच्या वतीने आरोपींविरुद्ध कोर्टात उभे राहणार आहेत. या सर्व प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच वकिलांचे मानधनही सरकार कडून दिले जाणार असल्याचे पुढे ते म्हणाले.