Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासासंदर्भात आ. महेंद्र दळवी यांना ठोस आश्वासन

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासासंदर्भात आ. महेंद्र दळवी यांना ठोस आश्वासन

आज अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची सहयाद्री अतिथीगृह, मुंबई येथे मतदारसंघातील पर्यटन विकासासंदर्भात भेट घेतली. यावेळी अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासासाठी विशेष निधी देण्याची मागणी केली. पर्यटन विकासामुळे या तालुक्यांतील रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असे त्यांनी पर्यटन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

याबाबत महाराष्ट्र वार्ताशी संवाद साधताना ते म्हणाले की, “पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्हाला येत्या अधिवेशनात अलिबाग-मुरुड-श्रीवर्धन येथील पर्यटन विकासाबाबत निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली तसेच येत्या काही दिवसात अलिबाग येथे भेट देण्याचे आश्वासन दिले.”

याप्रसंगी शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे व अलिबाग शिवसेना नेते संतोष निगडे उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *