मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर पलटवार म्हणाले “कोणत्याही विकासकामांना आम्ही स्थगिती दिली नाही”
नागपूर: नागपूर येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे चहापानानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद…
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ, डॉ. नितीन राऊत आदी मान्यवर उपस्थित
मुख्यमंत्री म्हणून प्रथमच नागपुरात आलो आहे. मुंबईतील अधिवेशन झाले, मुख्यमंत्री म्हणून नव्या सरकारची कारकीर्दीची सुरुवात उद्यापासून होत आहे. जनतेच्या पाठबळावर हे सरकार आलं आहे. त्याच्या आशीर्वादाने जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करेल असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “कोणत्याही विकासकामांना आम्ही स्थगिती दिली नाही. मेट्रोच्या आरे कार शेडमधील कामांना फक्त स्थगिती दिली आहे.”