हा महाराष्ट्र आहे, सुडाचे राजकारण कधीच सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडाने वागणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबई: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी उपस्थित इच्छुकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “यावेळी मला सत्ता पाहिजेच, सगळ्या २८८ जागांवरच्या इच्छुकांना मी बोलावले आहे. गेल्या ५ वर्षांत आपण जे काही काम केलं आहे त्याबद्दल धन्यवाद द्यायला बोलावले आहे. मी स्वतः शिवसेनाप्रमुखांना हातात हात घेऊन वचन दिले आहे की एक न एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन.”
सध्या राजकीय नेत्यांवर होणाऱ्या ‘ईडी’ च्या कारवाई चा संदर्भ घेत ते म्हणाले की, “हा महाराष्ट्र आहे, सुडाचे राजकारण कधीच सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडाने वागणार नाही. “२००० साली शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न केला गेला, शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात हजर झाले आणि न्यायमूर्तींना विचारले माझा गुन्हा काय आहे?”
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उपस्थित इच्छुकांना AB फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, प्रचार साहित्य व प्रचाराबाबत मार्गदर्शन केले.”
Photo – राजेश वराडकर
