मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना-भाजप मध्ये सत्ता स्थापनेवरून कटुत्व आलं होतं. पण आज झालेल्या भेटीच्या वेळी वातावरण खेळीमेळीचं दिसलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही दोघांना भेटून मनापासून आनंदी झालेले दिसले.