“मावळचा पर्यटनाच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलणार”
मुंबई/रायगड: मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.
यावेळी झालेल्या बैठकीत मावळ तालुक्यांतील एकविरा मंदिर परिसर विकास तसेच कार्ला, भाजा या लेणीं व राजमाची, लोहगड, विसापुर किल्ले संवर्धन विकासाबाबत विषय खासदार बारणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याजवळ मांडले. आमदार सुनिल शेळके व संबंधित विभागाचे आधिकारी उपस्थित होते.