Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार”; कल्पिता पिंगळे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

ठाणे, दि.३: “ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू…तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा” अशा शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज दिल्या.

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे…ताई तुम्ही काळजी नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका फक्त लवकरात लवकर बरे व्हा. राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांची विचारपूस केली.

मुख्यमंत्री ठाकरे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून पिंपळे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेत असतात. आज त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *