Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषद निवडणूक बिनविरोध

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार; विधानपरिषद निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजची अखेरची दिनांक होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी दि. १२ रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे

गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी).

उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).

शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).

राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस).

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *