Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उदयनराजे म्हणाले, “माझा राजीनामा मागण्याऐवजी जे सरकारमध्ये आहेत त्यांचा घ्या… राज्य, देश सुखी होईल”

उदयनराजे म्हणाले, “माझा राजीनामा मागण्याऐवजी जे सरकारमध्ये आहेत त्यांचा घ्या… राज्य, देश सुखी होईल”

पुणे: दिल्लीतील भाजप मुख्यालयातून प्रसिद्ध झालेल्या भाजप नेते भगवान गोयल लिखित छत्रपती शिवाजी महाराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील तुलनात्मक पुस्तकामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं. यात विशेष शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उडी मारत थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशांजांना निषेध व भाजपच्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली होती. यानंतर खासदार युवराज संभाजीराजे यांनी संजय राऊत यांच्यावर एकेरी टीका केली होती.

आज सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पुस्तकाबाबत संताप व्यक्त केला पण त्याच सोबत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली.

वाचा माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

– जेम्स लेनच्या वेळी शिवसेना कुठं गेली होती अस्मिता? शिवसेनेला सवाल.

– हे पक्ष केवळ राजकारण करत आहेत. शेतकरी मरायला लागले आहेत, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पळवापळवी सुरू होती. राज्याचा खेळ खंडोबा केला.

– शिवसेना भवनावरील चित्र बघा…शिवाजी महाराज कुठं आहेत? वरती कोण…खाली कोण… बघा

– कुणालाही ‘जाणता राजा’ची उपमा देणं याचा निषेध.

– जाणता राजा फक्त आणि फक्तछत्रपती शिवाजी महाराज.

– छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष

– लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का?

– पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं

– महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का?

– माझा राजीनामा मागण्याऐवजी जे सरकारमध्ये आहेत त्यांचा घ्या… राज्य, देश सुखी होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *