दुपारी अडीच वाजता सुरत हून गुवाहाटी साठी रवाना
मुंबई, दि.२६ : आताच हाती आलेल्या वृत्तानुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेची साथ सोडत थेट एकनाथ शिंदे यांच्या कंपूत प्रवेश केला आहे. आर्यन एअर सर्विसेस च्या फाल्कन २००० मधून त्यांनी सुरत वरून गुवाहाटी साठी उड्डाण केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उदय सामंत ही या कंपूत सामील होतील अशी अटकळ होती. उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ची साथ सोडत शिवबंधन हाती बांधत सेनेत प्रवेश केला होता. उदय सामंत हे तसे आयाराम-गयाराम म्हणूनच प्रसिद्ध आहेत. परंतू, त्यांच्या बंडखोरीमुळे रत्नागिरीतील शिवसैनिकांत संतापाची लाट पसरली असून उदय सामंत यांचा निषेध करण्यासाठी संध्याकाळी सेना कार्यकर्ते जमणार असल्याचे कळते. उदय सामंत यांना पकडून बंडखोर आमदारांची संख्या एकूण ४० वर पोहोचाली आहे.
