Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेना वि. शिंदे ! शिवसेनेच्या दोन्ही गटांची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात

शिवसेना वि. शिंदे ! शिवसेनेच्या दोन्ही गटांची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात

मुंबई, दि. २७ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या बरोबर असलेल्या गुवाहाटी इथं गेलेल्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांच्या नेतृत्वाखालील कायदेतज्ञं मांडणार आहेत. दरम्यान शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना केलेल्या ट्विटमध्ये आपण आपल्या पक्षाविरोधात बंड केलेलं असून १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याबरोबर संपर्क असलेल्या पक्षाबरोबर सत्तेत सहभागी होणे योग्य वाटले नाही म्हणून हे बंड केल्याचं सांगितलं आहे. शिंदे यांच्या या ट्विटचा रोख राष्ट्रवादीचे सध्या ईडीच्या कारवाईमुळे अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्याकडे आहे.

राज्यातलं आतापर्यंतचं हे सर्वोत महत्वाचं बंड असून शिवसेनेच्या या प्रकरणावर तोडगा काढण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येत नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल शिवसेनेचे उच्च आणि तंत्रज्ञान मंत्री उद्य सामंतही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. बंडखोर आमदारांना उत्तर देण्याची मुदत काल संध्याकाळी साडेपाच वाजता संपल्यानंतर शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज सकाळपासून सूनावणी सुरु केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ठाणे इथं शिवसेना किसननगर शाखेच्या वतीनं माजी नगरसेवक तसंच एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी समर्थकांना उपस्थित राहण्याची हाक दिली होती. शिंदे समर्थक येण्यापूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला. यावेळी, टेंभीनाक्याकडून तलावपाळीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बहुतांश नागरिकांना पायी जावं लागत होतं. पोलीस बंदोबस्त पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला गर्दी केली होती. यावेळी, दंगल नियंत्रण पथकासह ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी या परिसराचा ताबा घेतला होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *