साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात २९५ कोटी १३ लाख २ हजार ५०० रुपयांचा निधी वितरित झाला आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण १ हजार २११ कोटी ६५ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना २९५ कोटी १३ लाख
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष २०१६-१७ ते २०१८-१९ या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण २५८ कोटी 3 लाख ४७ हजार ५०० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (२१ नोव्हेंबर २०१९) ३७ कोटी ९ लाख ५५ हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
वर्ष २०१६-१७ ते २०१८-१९ या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील १८ राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण १ हजार १० कोटी ४२ लाख ८ हजार ४०० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (२१ नोव्हेंबर २०१९) २११ कोटी २४ लाख ८१ हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीपैकी एकूण किती निधी राज्याने वापरला याचे तपशील पाहण महत्वाचं ठरेल.
केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सौजन्य – Maharashtra DGIPR
