Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देशात पेट्रोल-डिझेल च्या दरांची विक्रमी घोडदौड; राज्यातल्या ठाणेसह अनेक जिल्ह्यांत पेट्रोल १०० पार

देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मे महिन्यात चौदा वेळा वाढ

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आतापर्यंत या महिन्यात १४ वेळा आणि या वर्षी ४० वेळा किंमती वाढवल्या असून देशभरातील वेगवेगळ्या राज्यात करांच्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेल दर प्रति लिटर १८ ते ३१ पैश्यांनी वाढले आहेत.

आजच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत २४ पैशांनी वाढून ९३ पूर्णांक ६८ रुपये प्रतिलिटर झाली आहे तर डिझेलची किंमत २९ पैशांनी वाढून ८४ पूर्णांक ६१ पैसे झाली आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरच्या जवळ पोहोचलं असून ९९ पूर्णांक ९४ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे तर डिझेल ९१ पूर्णांक ८७ रुपये प्रतिलिटरवर आलं आहे. तर ठाणे पालिका हद्दीत पेट्रोल ने १०० चा दर पार केली आहे. येथे पेट्रोल चा दर लिटर मागे १००.०६ रुपये आहे. सोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत पेट्रोल चे दर १०२ रुपयांच्या पार गेले आहेत. आपलं जमा झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दीड ते दोन रुपयांची आणखी वाढ होऊ शकते असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या नाहीत तर आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशातील ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलची भारी किंमत मोजावी लागणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *