Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाणे सी जी एस टी आयुक्तालयाकडून २२ कोटी रुपये मूल्याचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड; दोन व्यापाऱ्यांना अटक

ठाणे सी जी एस टी आयुक्तालयाकडून २२ कोटी रुपये मूल्याचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड; दोन व्यापाऱ्यांना अटक

ठाणे: मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी २२ कोटी रुपयांचे जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकिस आणले आहे. सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन ​​यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोन व्यावसायिकांना अटक केली आहे जे वडील आणि मुलगा आहेत. मेसर्स शाह एंटरप्रायझेस आणि मेसर्स यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगळ्या फर्मचे ॲाफिस कांदिवली पश्चिम, मुंबई येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहेत. ११.८० कोटी रुपये आणि १०.२३ कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेउन त्यांना मंजूर करण्याच्या प्रक्रियेत या व्यक्ती गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट हे बनावट संस्थांकडून मिळवून ईतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या.

या दोघांना सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत कलम १३२(१)(b) आणि (c) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करून मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

 प्रामाणिक करदात्यांना अनुचित स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी सीजीएसटी मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम विभाग अधिक तीव्र करणार आहे अशी माहिती ठाणे आयुक्तालयाचे सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *