Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विकसित भारत संकल्प यात्रेचा ठाणे-चेकनाका येथून प्रारंभ, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते झाला शुभारंभ

माहिती रथ यात्रा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात करणार भ्रमण

मुंबई, दि. २८: केंद्र सरकाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहीती सर्व सामान्य जनतेला व्हावी आणि त्या योजनांचा थेट लाभ जनतेने घ्यावा यासठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. याच यात्रेचा माहिती रथ आजपासून ठाणे जिल्ह्यातल्या विविध गावात पोहचणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेचा ठाणे येथील चेकनाका इथून आज प्रारंभ झाला. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते यात्रेची सुरूवात. यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश मस्के, महापालिकाकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेल्या विविध योजनांची माहिती थेट जनतेला व्हावी यासाठी ठाणे शहरास जिल्ह्यातल्या विविध गावात हा माहिती रथ पोहचणार आहे असे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

ठाणे येथील चेकनाका येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त पीएम स्वनिधी योजना, पीए-AMRUT योजना, पीएम-आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, आधार कार्ड नोंदणी केंद्र इत्यादी योजनांची माहिती देणारे स्टाल लावण्यात आले आहेत. तसेच मोफत आरोग्य उपचार आणि तपासणी शिबीर भरवण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने औषधे रुग्णांना मोफत देण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *