मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मुंबई: चक्रीवादळात अनेक जणांना जीव गमवावा लागलेल्या बार्ज पी ३०५ च्या कॅप्टनविरोधात काल मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बार्ज पी ३०५ च्या मुख्य अभियंत्याच्या तक्रारीवरुन कॅप्टन राकेश बल्लाव यांच्यासह अन्य काहीजणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे अशी माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पी चैतन्य यांनी दिली.
वादळामुळे बुडालेल्या बार्ज ३०५ वर एकंदर २६१ कर्मचारी होते. त्यातल्या १८८ जणांना वाचवण्यात यश आलं असून ४९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. २६ जण अजूनही बेपत्ता असून नौदलाकडून त्यांचा शोध घेण्याचं काम आजही सुरू आहे.
