Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक; पुणे ‘एसीबी’ ची मोठी कारवाई

जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक; पुणे ‘एसीबी’ ची मोठी कारवाई

जालना: पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तसंच पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे आणि विठ्ठल खार्डे यांना, काल २ लाख रुपयांची लाच स्विकारताना अटक केली.

तक्रारदाराविरुद्ध दाखल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, खिरडकर याने पोलिस नाईक अंभोरेच्या मार्फत पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी नंतर ती कमी करुन तीन लाख रुपये घेण्याचं मान्य केलं होतं.

अंभोरे हा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातच यापैकी दोन लाख रूपये स्वीकारत असताना, सापळा रचून ही अटक करण्यात आली. पुणे पथकानं यावेळी खिरडकरच्या घराचीही झडती घेतली.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *