“हर एक मराठा में छुपा है लाख मराठा” अजय देवगण च्या अंगावर रोमांच आणणाऱ्या “तानाजी” चा ट्रेलर पाहिलात का?
गेले अनेक दिवस ज्या चित्रपटाची चर्चा शिवप्रेमींमध्ये होती त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित “तानाजी द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला.
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण ने तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली असून अभिजित केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. यात सैफ अली खान मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोड या राजपूताची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री काजोल ने तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.
