Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’या नव्या चित्रपटाचा पोस्टर

पहा स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’या नव्या चित्रपटाचा पोस्टर

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आपल्याला अनेक चित्रपटामध्ये नवं नव्या भूमिका साकारताना दिसतो. लवकरच स्वप्नील एका हटके अंदाजात प्रेक्षकांपुढे येणार आहे. सरकारनामा, लपंडाव अशा चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी देवधरच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून यात स्वप्नील जोशी अगदी वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. सुनील कुलकर्णी असे त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे.

चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असल्याचे प्रेक्षकांना सांगितले आहे. तसेच या पोस्टरवर ‘पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समृद्ध होणं कठीण’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या पोस्टर मध्ये स्वप्नील एका दुचाकीवर स्वार आहे आणि त्याच्या मागे चंद्रकांत कुलकर्णी बसलेले दिसत आहेत.

‘मोगरा फुलला’ हा चित्रपट मुळात एक प्रेमकथेवर आधारित आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सुनील कुलकर्णी लग्नाचे वय उलटून गेले तरी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहतो. पण एके दिवशी आपण प्रेमात पडल्याची जाणीव त्याला होते. तो जिच्या प्रेमात पडला आहे ती एक सधन कुटुंबातील पण स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची तरुणी आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *