Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘भारत’ मधील सलमान खानचा आगळावेगळा लूक पहा…

‘भारत’ मधील सलमान खानचा आगळावेगळा लूक पहा…

अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटातील सलमानचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ वेगळ्याच अवतारात या पोस्टरमध्ये दिसत आहे.

‘देश आणि एका व्यक्तीचा एकत्रित प्रवास,’ अशी टॅगलाइन लिहत, ‘इतने सफेद बाल मेरे सर और दाढ़ी में हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही हैं #Bharat.’ असं लिहून सलमाननं स्वत: त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सफेद दाढी, मिश्या आणि चश्मा लावलेला सलमान खूपच वयस्कर दिसत आहे. सलमानच्या चाहत्यांना त्याचा हा लुक प्रचंड आवडला असून हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटातील सलमानचा हा लूक लक्षवेधी ठरतोय. सलमानसोबतच यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *