हिमॅन धर्मेंद्र यांनी पुत्र सनी देओल साठी मतदारांना घातली भावनिक साद
ज्येष्ठ सिनेअभिनेते हिमॅन धर्मेंद्र यांचे सुपुत्र अभिनेते सनी देओल यांना भाजप तर्फे पंजाब येथील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे. आज सकाळी धर्मेंद्र यांनी ट्विटर द्वारे आपलं मनोगत व्यक्त करत सर्व मतदारांना सनी देओल यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात कि, “राजकारण इतकं गलिच्छ झालय मित्रांनो कि इथे A चे Z होतं आणि Z चं A होतं. आम्ही यातली ABC काहीच जाणत नाही पण भारत आमची आई आहे आणि आई साठी आम्ही आहोत. आम्ही आपल्याकडून सहयोग मागतो …आम्हाला साथ द्या. हा विजय तुमचा असेल. माझ्या पंजाबच्या भावा-बहिणींचा असेल. भारतमातेचे सुंदर अंग गुरुदासपूरचा असेल.” अशा प्रकारे भावनिक साद घालत धर्मेंद्र यांनी पंजाबवासियांना आपल्या मुलामागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. जर सनी देओल जिंकले तर देओल परिवारात दोन खासदार होतील. हेमा मालिनीहि या निवडणुकित भाजपच्याच तिकिटावर निवडणुकीसाठी उभ्या आहेत.
