मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. १० : मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
भारत-मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सुनेत्रा अजित पवार व शीलाबाई बाप्पू यांच्यामध्ये भारत–मॉरिशस संबंध, महाराष्ट्र–मॉरिशस ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध, व्यापार-गुंतवणूक संधी तसेच पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मॉरिशसचे कॉन्सुल जनरल डॉ. डी. के. बकटोवार, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दयानंद बाप्पू उपस्थित होते.
