Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय वडिलांच्या इच्छेविरोधात घेतला: सुजय विखे-पाटील

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय वडिलांच्या इच्छेविरोधात घेतला: सुजय विखे-पाटील

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

नगरची सीट राष्ट्रवादीने न सोडल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलानेच कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

मी हा निर्णय माझ्या आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध जावून घेतला आहे. माझ्या कुटुंबियांना अभिमान वाटेल असे काम भाजपच्या मार्गदर्शनाखाली मी करेन. मुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार यांनी हा निर्णय घेण्यासाठी पाठिंबा दिला आणि मदत केली. मी आणि माझे कार्यकर्ते नगर जिल्ह्यात भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सुजय यांनी सांगितले, तसेच संकटकाळी ज्यांनी मला साथ दिली मी त्यांच्याबरोबर असेन, असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजपाचा विजय असो अशी घोषणा दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या आमदारांनी दिलेला पाठिंबा आणि मदतीमुळे मलाहा निर्णय घेता आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *