Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह विधिमंडळ सदस्य व विधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मुलीचा विवाह सोहळा 1 डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्‍न झाला. त्‍यामुळे ते सभागृहात शपथ घेवू शकले नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांनी आज विधानसभा अध्‍यक्षांसमक्ष विधानसभा सदस्‍य म्‍हणून शपथ घेतली.

आ. सुधीर मुनगंटीवार हे गेली सहा टर्म सलग विधानसभा सदस्‍य आहे. १९९५ साली ते प्रथमतः विधानसभागृहाचे सदस्‍य झाले. १९९५, १९९९, २००४ या तीन टर्म मध्‍ये ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे सदस्‍य होते. २००९ मध्‍ये मतदार संघ पुनर्रचनेनंतर त्‍यांनी शेजारच्‍या बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली व विजयी झाले. २००९, २०१४ आणि आता २०१९ असे सलग ३ वेळा ते बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातुन विजयी झाले. १९९९ मध्‍ये ते काही महिने पर्यटन व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री होते. तर गेली पाच वर्षे अर्थ, नियोजन व वन खात्‍याचे मंत्री म्‍हणून त्‍यांनी जबाबदारी सांभाळली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *