बॉलिवूडच्या हवा-हवाई श्रीदेवी यांच्या आवडत्या साडीचा आज लिलाव
आज २४ फेब्रुवारी अभिनेत्री श्रीदेवी यांचा पहिला स्मृती दिन असून वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
गाजविणारी बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना चटका लावून जाणारी होती.
दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर एक वर्षांनी बोनी कपूर त्यांच्या साडीचा लिलाव करत आहेत. या लिलावातून मिळणारी रक्कम बोनी कपूर चॅरिटीला दान करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवी यांना कोटा हि साऊथ इंडियन साडी फार आवडायची, श्रीदेवी यांची सिक्स यार्ड कोटा साडी त्यांच्या साऊथ इंडियन रूटची आठवण करून देते. दक्षिण भारतात जन्मलेल्या श्रीदेवी यांची ही साडी त्यांची ओळख बनली आहे. पारिसेरा नावाच्या एका वेबसाईटवर या साडीचा लिलाव सुरु केला आहे. या लिलावाच्या सुरुवातीला ४० हजार रुपयांपासून सुरुवात झाली असून आतापर्यंत सर्वांत अधिक म्हणजे सव्वा लाख रुपये लिलावाकरिता सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहिती नुसार ही रक्कम वाढू शकते.
श्रीदेवी यांची ही लिलावातून मिळणारी रक्कम कंसर्न इंडिया फाउंडेशन प्रोग्रॅमसाठी दिला जाणार आहे. हे फाउंडेशन महिला, मुले, वृध्द आणि दिव्यांगासाठी काम करते.
