सायबर पोलिसांचं नागरिकांना आवाहन
व्हॅलेंटाईन डे निमित्त समाजमाध्यमांवर फ्री गिफ्ट तसंच फ्री कुपनच्या अनेक लिंक व्हायरल होऊ लागल्या आहेत. अशा कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नये, अशा लिंकवर आपली वैयक्तिक माहिती देवू नये असं आवाहन, मुंबई सायबर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं केलं आहे.
मुंबईतलं ताज हॉटेल फ्री कुपन, तसंच फ्री गिफ्ट कार्ड देणार असल्याबाबतचीही एक लिंक व्हायरल झाली होती. मात्र ही लिंक बनावट असल्याचं आणि संबंधित वृत्त खोटं असल्याचं ताज हॉटेलनं स्पष्ट केलं आहे.
